शेतकऱ्याचा मुलगा सैन्यात भरती! 

तुमच्याकडे कर्तृत्व असेल तर तुमची पार्श्वभूमी काय आहे याचा फरक पडत नाही.

एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा रोवायचा असेल तर त्यासाठी अपार कष्ट आणि जिद्द आवश्यक आहे.

गुणवत्ता, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण करता येतं.

वर्धा जिल्ह्यातल्या 21 वर्षांच्या शेतकरी मुलानं हे दाखवून दिलंय. त्याची नुकतीच सैन्यदलात निवड झालीय.

आदेश कुंडलिक चंदनखेडे असं या शेतकरी पुत्राचं नाव आहे.

तो हिंगणघाट तालुक्यातल्या टेंभा या गावचा आहे.

शाळेपासून सैन्यात जाण्याचं त्याचं ध्येय होतो. त्याच्या या स्वप्नाला आई-वडिल, मामांसह प्रशिक्षकांनी देखील साथ दिली.

MPSC Exam : 7 वर्षात 23 वेळा अपयश! अखेर 24व्या प्रयत्नात तरुणाने मिळवली सरकारी नोकरी