स्ट्रॉबेरी शेतीतून महिला शेतकरी झाली मालामाल! 

सध्याच्या काळात आधुनिक शेतीची कास धरत अनेक शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या प्रदेशात स्ट्रॉबेरीची शेती केली जायची.

पण आता स्ट्रॉबेरी इतर भागातही लावली जात असून त्यातून दुहेरी उत्पन्न घेतले जात आहे.

मावळ तालुक्यातील चांदखेडच्या महिला शेतकरी वैशाली गायकवाड यांनी आपल्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे.

गेल्या 4 वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेतीतून त्या लाखोंची कमाई करत आहेत.

गेल्या 4 वर्षांपासून आम्ही स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे. ही शेती करत असताना सुरुवातीला नर्सरीची रोपे लावतो.

जून ते जुलैमध्ये लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यात तयार होतात.

यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये फळ यायला सुरुवात होते, असं शेतकरी प्रथमेश गायकवाड यांनी सांगितलं.

… पण ती खचली नाही; ट्रॅक्टर चालवत सांभाळतीय शेतीचा कारभार