बांबू लागवडीसाठी 7 लाखाचं अनुदान

बांबू लागवडीसाठी 7 लाखाचं अनुदान

बांबू हे प्रतिकूल वातावरण, कमी खर्च आणि कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे.

सध्याच्या काळात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बांबू शेती हा सक्षम पर्याय आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून बांबू शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. 

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 4 जिल्ह्यांचा समावेश केलाय. 

सातारा, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिह्यातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.

या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू शेतीसाठी हेक्टरी 7 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे. 

याबाबत बांबू लागवड चळवळीचे जिल्हा समन्वयक डॉ सुयोग कुलकर्णी यांनी माहिती दिलीय. 

बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तीन वर्षात सात लाख रुपये अनुदान मिळणार आहे. 

जालना जिल्ह्यात 2 ऑक्टोबर 2021 पासून बांबू लागवड चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.