आजपासून बदलणार Fastag चा नियम, तत्काळ करा हे काम; अन्यथा लागेल दुप्पट टोल
Fastag एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे. यामध्ये Radio Frequency Identification (RFID) टेक्नॉलॉजी आहे. ज्याच्या मदतीने हे टोल प्लाजावर ऑटोमॅटिक टोल पेमेंट करते.
आज Fastag KYC ची लास्ट डेट आहे. तुम्ही आज रात्री 12 वाजेपूर्वी केवायसी अपडेट केलं नाही तर तुमचं फास्टॅग ब्लॅक लिस्ट म्हणजेच बंद केलं जाईल.
Fastag बंद किंवा ब्लॅक लिस्ट झाला. तर त्या कंडिशनमध्ये कोणत्याही टोल प्लाजावर पोहोचले तर तिथे डबल टोल टॅक्सची पेमेंट करावी लागू शकते.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI)ने One Vehicle, One FASTag उपक्रमाची सुरुवात केली. यानंतर NHAIने RBI च्या गाइडलाइन्सनुसार, लेटेस्ट Fastag KYC करण्यास सांगितलं.
अनेक लोक एकाच कारसाठी अनेक फास्टॅग किंवा अनेक गाड्यांसाठी एकच फास्टॅगचा वापर करतात.
अशा वेळी चांगली अॅक्सुरेसी आणि लोकांच्या या चालाकीवर लगाम लावण्यासाठी One Vehicle, One FASTag उपक्रमाची सुरुवात झाली आणि सर्वांना आपल्या लेटेस्ट Fastag ची KYC करण्यास सांगितलं.
लेटेस्ट Fastagचीच KYC करा. डेडलाइननंतर जुने फास्टॅग बंद केले जातील.
तुम्ही तुमची Fastag KYC कंप्लीट करुन घ्या. यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडची मदत घेऊ शकता.
Fastag KYC करण्यास काही अडचण येत असेल तर तुमचा फास्टॅग कोणत्या बँकेचा आहे हे पाहा. त्यानंतर त्या बँकेच्या जवळच्या ब्रांचसोबत संपर्क करु शकता.