देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 1 फेब्रुवारी रोजी वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशावेळी अर्थमंत्र्यांनी नेटवर्क 18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर राहुल जोशी यांच्याशी विशेष मुलाखतीत बातचीत करताना महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केले.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे याला कोणत्या सीमेत बांधता येणार नाही. हेच कारण आहे की महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील, असं अर्थमंत्री म्हणाल्या.
खाद्यपदार्थांची महागाई वाढण्यापासून रोखण्यासाठी व्यापाऱ्यांची देखील महत्वाची भूमिका आहे.
सरकारची एक कमिटी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी दिवसरात्र काम करत असते. देशात कोणत्या गोष्टीचे उत्पादन कमी होईल असा अंदाज येताच ती गोष्ट इतर आयात करण्याबाबत निर्णय घेतले जातात.
डाळींसाठी आपण आयातीवर निर्भर आहोत. त्यामुळे डाळी आयात कराव्या लागतात त्यामुळे किंमत ठरवण्यात पुरवठादाराची मोठी भूमिका असते.
खाद्यपदार्थांची महागाई कमी करण्यासाठी सरकारने अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत, ज्यामुळे आपण महागाईवर नियंत्रण मिळवू शकू. मला विश्वास आहे की महागाई नियंत्रणात आणता येईल.
भारत नक्कीच 7 टक्के विकासदाराने पुढे जाईल. मला आशा आहे की 7 टक्के विकासदाराचे लक्ष गाठण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
भारताची अर्थव्यवस्था सलग वाढत आहे, आम्ही महागाईला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.