सोमवारच्या दिवशी करा हे उपाय, नशिब नक्की चमकेल
सोमवारचा दिवस हा भगवान शंकराला समर्पित असतो.
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली.
सोमवारी देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.
तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या अशुभ प्रभावाच्या कारणाने तणावात असू शकता.
तर मग अशावेळी सोमवारी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करुन भगवान शंकराची पूजा करावी.
गंगाजलमध्ये काळे तिळ मिसळून भगवान शंकराला अभिषेक करावा.
यादिवशी असे केल्याने जीवनातील दु:ख आणि संकटापासून मुक्ती मिळते.
सोमवारी कच्च्या दुधाने अभिषेक करावा. यामुळे कुंडलीत चंद्रमा ग्रहाची स्थिती मजबूत होते.
गंगाजल आणि मध मिक्स करुन भगवान शंकराचा अभिषेक करावा. यामुळे कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत होतो.
सोमवारी गंगाजलमध्ये शमीची पाने मिसळून शंकराचा अभिषेक करावा. यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील.