विविध देशांच्या संस्कृती आणि कलेला खऱ्या अर्थाने लाकडाने सौंदर्यसंपन्न केलेले आहे.
लाकडाचा वापर फर्निचरमध्ये अशा कल्पकतेने केला जातो की त्यातून संस्कृती, चालीरिती, विचार, साहित्य, कला सर्व काही व्यक्त होऊ शकते.
घराच्या सौंदर्याला केवळ लाकडी फर्निचरच खऱ्या अर्थाने रिचनेस आणते.
दिवाळी घरसजावटीसाठी हे फर्निचर जर तुम्हाला स्वस्तात मस्त मिळत असेल तर मग ? आज आम्ही तुम्हाला त्याविषयी माहिती देणार आहोत.
View All Products
पुण्यातील पिंपळे सौदागर भागातील मार्केटमध्ये सहारनपूर फर्निचर मिळत आहे.
अगदी कमीतकमी म्हणजेच 20 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंतच लाकडी फर्निचर या ठिकाणी उपलब्ध आहे.
चावीच्या रिंगपासून ते लाकडापासून बनवलेल्या स्टायलिश वॉल क्लॉकपर्यंत सर्व काही या ठिकाणी मिळत आहे.
चावीच्या रिंगपासून ते लाकडापासून बनवलेल्या स्टायलिश वॉल क्लॉकपर्यंत सर्व काही या ठिकाणी मिळत आहे.
हा सेल दिवाळीनिमित्त पिंपळे सौदागर भागात सुरु असून इथे वेगवेगळ्या फर्निचरच्या कलाकृती पाहावयास मिळतील.