गणेशोत्सवात मुलांच्या व्यक्तमत्त्वाचा असा करा विकास
मुलं शाळेत आणि अभ्यासात इतकी व्यस्त होतात की त्यांना सणांची फारशी माहिती नसते.
त्यामुळे मुलांना सणाच्या कामात गुंतवून मदत करणे, टीमवर्क, सर्जनशीलता अशा गोष्टी शिकवा.
या गणेश चतुर्थीला आणि संपूर्ण उत्सवात मुलांना कसे सामावून घेता येईल ते जाणून घेऊया.
या गणेशोत्सवात मुलांना शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवायला आणि रंग द्यायला शिकवा.
मुलांना मंदिर सजवण्याचे काम द्या, गणेशाची स्थापना करून घ्या आणि 10 दिवस देखभालीची जबाबदारी द्या.
गणेशजींच्या कथा वाचायला सांगा. यामुळे त्यांना वाचनाची आणि बोलण्याची चांगली सवय लागेल.
मुलांना गणेशोत्सवात पूजा आणि प्रसादाचे काम द्या. नवीन आरत्या, भजन पाठ करण्यास सांगा.
दररोज नवीन प्रसादाचा विचार करा आणि आरती करण्यासाठी घरातील सर्व लोकांना एकत्र करा.
मुलांना दानाचे महत्त्व सांगा. जुने कपडे, खेळणी गोळा करून ती गरीब किंवा गरजूंना वाटायला सांगा.