या 5 मोदकांच्या प्रसादाने बाप्पा होईल प्रसन्न

शुगर फ्री मोदक - काजू, बदाम, नारळ आणि खजूराचे मिश्रण वापरून तुम्ही हे मोदक बनवू शकता. 

रेसिपी - सुकामेवा बारी करून भाजून घ्या. त्यात खजूर आणि मनुक्याची पेस्ट घाला आणि मोदक बनवा. 

बर्फी मोदक - काजूची पेस्ट, तूप खवा, दूध, साखर, केशर आणि सुका मेवाचा वापर करून हे मोदक बनवता येतात.

रेसिपी - तूपात काजूची पेस्ट तळून घ्या. त्यात खवा आणि दूध घाला घट्ट होऊ द्या. नंतर त्यात साखर, केशर आणि सुका मेवा घालून मोदक बनवा. 

उकडीचे मोदक - तांदळाचे पीठपासून हे मोदक बनवूनते वाफवले जातात. त्यात तुम्ही तुमच्या आवडीचं मिक्षण घालू शकता.

रेसिपी - तांदळाचे पीठ भिजवून त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्या आणि वाफवून घ्या.

चॉकलेट मोदक - ग्लुकोज बिस्किटांची पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट, दूध आणि तूपाचा वापर करून हे मोदक बनवतात.

रेसिपी - ग्लुकोज बिस्किटांची पावडरची दूध, चॉकलेट आणि तूप घालून पेस्ट बनवा. त्यात सुका मेव्याचं मिश्रण घालून मोदक बनवा.

केसरी मोदक : तांदळाचे पीठ, केशर, खोबरे, तूप, वेलचीपूड, बेदाणे, काजू आणि गूळ वापरून हे मोदक बनवाता येतात. 

रेसिपी - तूप, केशर आणि तांदळाचे पीठचे गोळे तयार करा. त्यात वरील पदार्थांचं मिश्रण घालून मोदकाचा आकार द्या आणि वाफवून घ्या.