एकविरा आईचा गणेशभक्तानं साकारला हुबेहुब देखावा!

गणेशोत्सवात बाप्पाचं घरोघरी आगमन होतं.

बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे करण्यात येतात.

मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या साईराज सुभाष म्हात्रे या तरुणाने आपल्या घरी आरास साकारली आहे.

त्याने लोणावळा येथील कार्लातील आई एकवीरा मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती असलेली आरास साकारली आहे.

या देखाव्याला साजेशा बाप्पाची मूर्ती त्यानं स्थापन केलीय.

त्याचा हा देखावा आणि कोळी पेहरावातील गणेश मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मखर करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची मी विशेष काळजी घेतलीय.

त्यामुळेच संपूर्ण मखर ही कागदी वस्तूंचा वापर करत तयार केलीय.

चांद्रयान 3 चं लँडींग कसं झालं? बीडकरांना अनुभवता येणार तो थरार