बाप्पाचे स्वागत करताना 'या' चुका टाळा...    

गणपतीची मूर्ती खरेदी करताना ती कुठे फुटलेली नाही ना याची खात्री करून घ्या. खंडित मूर्ती पूजेसाठी वापराने अशुभ मानली जाते. 

मूर्ती खरेदी करताना, उजव्या बाजूला वळलेली सोंड असलेला गणपती घ्यावा. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. 

वास्तुनुसार घरात गणपतीची मूर्ती ईशान्य कोनात अशाप्रकारे ठेवावी, ज्यामुळे गणपतीची पाठ दिसणार नाही. 

गणपतीचे पूजन करताना शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. 

पूजेला बाप्पाच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून करावे. मात्र या पदार्थांमध्ये तुळशीची पाने घालू नये.  

गणेश चतुर्थीच्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावे. या दिवशी कोणाचाही राग किंवा मत्सर करू नये. 

गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि या दिवशी शारीरिक संबंध ठेऊ नये, असे काही लोक म्हणतात. 

गणपती चतुर्थीचे व्रत करताना केवळ सात्विक आहार आणि फळं खावी. तसेच तामसी पदार्थांपासून दूर राहावे. 

गणपतीचे वाहन मानल्या जाणाऱ्या उंदीरांना त्रास देऊ नये.