गौराईसाठी 150 रुपयांत दागिने
गौराईसाठी 150 रुपयांत दागिने
गौरी गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र तयारीची लगबग आहे.
बाजारपेठा सजावटीच्या साहित्यानं सजल्या असून गर्दीमुळे बाजारही फुललेले दिसत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गौरी गणपतीसाठी दागिने आणि सजावटीचं साहित्य स्वस्तात मिळतंय.
शहरातील सोनचाफा आणि सोन सखिया दुकानांत गौराईसाठी खास दागिने उपलब्ध आहेत.
या ठिकाणी गौराईसाठी अगदी सुंदर दाखला देखील कमी दरात उपलब्ध आहेत.
इथं गौराईसाठी अगदी दीडशे रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत दागिने मिळतील.
गौरीसाठीचा संपूर्ण साज इथं उपलब्ध असून टेम्पल ज्वेलरीही उपलब्ध आहे.
मोत्यांच्या दागिन्यांमध्ये चिंचपेठ, तन्मणी, झुमके, तोडे, बिंदी, नथ, मंगळसूत्र उपलब्ध आहेत.
गोल्डन फेअर मध्येही मंगळसूत्र, राणीहार, कोल्हापुरी साज आदी दागिने आपल्याला मिळतील.
मुंबईचं सिक्रेट मार्केट