हॉस्पिटलच्या बेडवरुनच रुग्णांनी  घेतलं बाप्पाचं दर्शन

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.

पुण्यातल्या प्रसिद्ध गणपती मंडळांसमोर काही किलोमीटर लांब रांगा लागत आहेत.

आजारपणामुळे हॉस्पिटलमधील बेडवरुन कुठंही जाता न येणा-या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते.

त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पेशंट्सना ते आहेत त्या विभागामध्ये, त्यांच्या खाटेवर बसून ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन घेता येत आहे.

सोबतच आरती करण्याचा आनंद देण्याची सुविधा ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी स्टार्टअप - डिजिटल आर्ट व्हीआरई या माध्यामातून ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे.

डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे.

जर्मनीत दिसली गणेशोत्सवाची धूम