गौरीच्या सजावटीसाठी ‘इथं’ करा सुंदर मुखवटे खरेदी
गौरी-गणपतीच्या आगमनाला आता काही दिवसच उरले आहेत.
यासाठी लागणाऱ्या सजावटींच्या वस्तूंनी मुंबईची बाजारपेठ सजलीय.
गौरीचे मुखवटे,दागिने, रेडिमेड साड्या यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झालीय.
मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या दिगंबर आर्ट्स या दुकानात गौरीचे वेगवेगळे मुखवटे मिळत आहेत.
गौरीचे वेगवेगळे मुखवट्याची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते.
अमरावती पॅटर्न, सोलापुरी पॅटर्न, कोल्हापुरी पॅटर्न, गजरा, आंबडा, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर पीओपी, फायबर, कापडी, लाकडी गौरीचे शरीर देखील आहेत.
गौरीसाठी लागणारे दागिने यामध्ये मंगळसूत्र, कानातले, कंबरपट्टा अशी आभूषण देखील दोनशे रुपयांपासून या ठिकाणी उपलब्ध आहेत.