दगडी जातं, पाटा वरवंट्याची करायचीय खरेदी? ‘इथं’ द्या भेट
स्वयंपाक करताना रोजच्या दिवशी वापरात येणाऱ्या वस्तू म्हणजे दगडी दगडी जातं, पाटा वरवंटा, खलबत्ता या आहेत.
या वस्तू मुंबईत तुम्हाला कुठे मिळतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
दादरच्या नक्षत्र मॉल परिसरात असलेल्या अर्थस सोल या दुकानात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गृह उपयोगी वस्तू मिळतात.
या दुकानाचे मालक योगेश चव्हाण सुरुवातीच्या काळात दादर स्टेशन जवळ देवाच्या पूजेचे सामान आणि मूर्ती विकत होते.
ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी दगडी दिवे, दगडी जातं, दगडी पाटा वरवंटा, खलबत्ता विकण्यास सुरू केले.
बाकी वस्तूंची किंमत 250 रुपयांच्या पुढे आहे.