पहिल्या पावसात भिजल्याने खरंच        तब्ब्येत बिघडते?   

पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे.

पहिला पाऊस पडल्यावर अनेकांना त्यात भिजण्याचा मोह आवरता येत नाही.

पहिल्या पावसात भिजणं शक्यतो टाळावं असा सल्ला तज्ज्ञ देतात.

उन्हाळा संपून जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

पहिल्या पावसात भिजल्याने केसात कोंडा होणे, खाज उटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

उन्हाळ्यात तापमान हे 40 अंश सेल्सियस इतकं असत आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे तापमान अचानकपणे 20 अंशापर्यंत खाली येत.

शरीराच्या तापमानात अचानकपणे बदल झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला, कफ असे आजार उद्भवू शकतात.

पहिला पाऊस पडतो तेव्हा हवेतील प्रदूषण हे पाण्यात उतरतं.

तेव्हा पावसात भिजल्याने त्वचेशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

(इथे दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही माहिती सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. तेव्हा अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा. संबंधित माहितीसाठी न्यूज १८ मराठी जबाबदार नसेल. )

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा