घरात गीझर आहे ना? मग या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

थंडीच्या वातावरणात गरम पाण्याची खूप गरज असते.

पाणी गरम करण्यासाठी गीझर चांगला पर्याय असतो.

गीझर लावणे ठिक आहे, पण काही गोष्टी विसरु नका.

गीझरमध्ये कटऑफ फीचर नसेल तर पाणी गरम झाल्यानंतर ते बंद करा.

दीर्घकाळ गीझर चालू राहिल्याने ते खराब होते.

नवीन गीझर खरेदी करत असाल तर ISI मार्क अवश्य चेक करा.

लोकल गीझर खरेदी केला तर आग लागण्याचा धोका असतो.

गीझरसोबत बाथरुममध्ये एग्जॉस्ट फॅन असणे आवश्यक आहे.

यामध्ये एक गॅस असतो, जो कार्बन डायऑक्साइड निर्माण करतो.