आल्याचे फायदेच नाही, नुकसानही आहे...

हिवाळा सुरू झाल्यावर चहामध्ये आले टाकले जाते.

आल्यात जिंक, अँटी ऑक्सिडेंटसह अनेक पोषक तत्त्व असतात.

तसेच याच्या सेवनामुळे नुकसानही होते.

आल्याचे जास्त सेवन केल्याने हार्ट प्रॉब्लेम, लो ब्लड शुगरसारखे आजार होऊ शकतात.

गर्भवती महिलांसाठी आल्याचे जास्त सेवन हे धोकादायक असू शकते.

आहार विशेषज्ञ डॉ. आरती आणि रजत यांनी याबाबत माहिती दिली. 

ते सांगतात की, आल्याचे सेवन अधिक प्रमाणात केले तर नुकसान होऊ शकते.

याच्या साइड इफेक्ट्समुळे छातीत जळजळ, अतिसार, ढेकर येणे आणि पोटाचे आजार होऊ शकतात.

याचे अधिक सेवन केल्याने थकवा येतो. तसेच व्यक्ती बेशुद्धही होऊ शकतो.