कांद्याची साल फेकण्यापूर्वी हे फायदे पाहा

कांद्याची साल फेकण्यापूर्वी हे फायदे पाहा

आपण रोजच्या आहारात जे पदार्थ खातो त्यांचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. 

कांद्याची साल कचरा पेटीत टाकून दिली जाते. पण हीच साल केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे कांद्याच्या सालीपासून केसांसाठी टोनर कसं बनवायचं सांगतात. 

कांदा चिरल्यानंतर कांद्याचे उरलेले भाग आणि त्याची साल एक ग्लास पाण्यामध्ये उकळायची. 

15-20 मिनिटे उकळून झाल्यावर ते गाळून घ्यायचं आणि मुळांपासून केसाला लावून घ्यायचं. 

सुकल्यानंतर केस धुवून घ्यायचे. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 

या उपायामुळे तुमचे केस चमकदार सुंदर होतील आणि जर केस गळती होत असेल तर तीही थांबू शकते.

या सोबतच कांद्याच्या सालींबरोबर कढीपत्त्याची पानंही ऍड करू शकता, असे खडसे सांगतात. 

कांद्याच्या सालीमध्ये विटामिन ए, सी, ई, अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.

महाराष्ट्रात पिकतेय टरबुजा एवढी संत्री