हरितालिका पूजा: मनासारखा पती मिळवण्यासाठी उपाय

यंदा 18 सप्टेंबर रोजी हरितालिकेचं व्रत आहे.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी केलं जातं.

या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात.

पं.हितेंद्र शर्मा यांच्या मते या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानं सौभाग्य वाढते.

अविवाहित मुलींनी मंदिरात शिव-पार्वतीची पूजा केल्यास त्यांना इच्छित जोडीदार मिळतो, असे मानले जाते

शुद्ध तुपाचे 11 दिवे लावल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

या दिवशी कुमारी ब्राह्मण मुलीला कपडे किंवा वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते.

वैवाहिक जीवनात आनंद मिळविण्यासाठी महादेवाला दूध आणि केशराचा अभिषेक करावा.

या दिवशी माता पार्वतीला 11 हळकुंडे अर्पण करा, चांगलं स्थळ जुळून येतं