लहान मूलांच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळणी. मुलांना प्रत्येक प्रकारची खेळणी हवी असतात.
काही क्षणांपूर्वी गाडीशी खेळणारे मुल अचानक कोडी सोडवणाऱ्या खेळणीचा हट्ट करते.
त्यांचे बाल हट्ट पुरवताना घरातल्या सर्वांची तारांबळ उडते. काही पालकांना महागडी खेळणी घेणं परवडत नाही.
त्यामुळे मुलांची समजूत कशी घालावी हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. पण, आता पालकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही.
डोंबिवलीतील आयटी प्रोफेशनल तरुण हर्षल वगळ हा गेल्या दहा वर्षांपासून पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणे खेळण्याची लायब्ररी चालवत आहेत.
विशेष म्हणजे त्याची ही लायब्ररी आता लवकरच ऑनलाईन सुरू होणार असून त्याचे खास ॲप तयार केले आहे.
लायब्ररीमधून आपण पुस्तक जशी घरी जाऊन वाचू शकतो त्याचप्रमाणे ही खेळणी देखील घरी घेऊन जाऊ शकतो.