हटके हेल्मेट; लक्ष विचलित झाल्यावर मिळतात संकेत!

शास्त्रज्ञांनी एक अनोखं हेल्मेट बनवल्याचा दावा केला आहे. 

हे हेल्मेट गाडी चालवताना तुमच्या मनावर लक्ष ठेवतं. 

थकवा किंवा एकग्रतेच्या अभावामुळे होणारे अपघात रोखणं हा त्याचा उद्देश आहे. 

या हेल्मेटचा शोध मेकानिका या जपानच्या कंपनीनं लावला आहे. 

हे हेल्मेट तुमच्या मेंदुच्या लहरींना टॅप करते आणि AI सह त्यांचे विश्लेषण करते. 

त्यानंतर हेल्मेट रिडआऊट तयार करते, जे मानसिकदृष्ट्या तुम्ही किती सक्रिय आहात ते सांगते.

गाडी चालवताना तुमचं मन भटकत असेल तर ब्रेक्सच्या सूचनाही देते. 

हेल्मेटमध्ये इल्क्टोएन्सेफॅलोग्राम कॅप्चर केलं जातं.

हे हेल्मेट लॉस वेगस, नेवाडा, येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सादर करण्यात आलं आहे.