'या'वेळी करा नाश्ता आणि रात्रीचे जेवण, कधीच वाढणार नाही पोट!
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर आपण नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी केले नाही तर यामुळे आपले वजन वाढू शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ काय असावी, जेणेकरून तुमचे वजन नियंत्रणात राहते.
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ जाणून घेऊया.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका हे नेहमी लक्षात ठेवा. रात्र असो वा दिवस, झोपण्याच्या ३ तास आधी अन्न खावे.
तज्ज्ञांच्या मते, सकाळी 7 ते 9 ही नाश्त्याची योग्य वेळ आहे.
नाश्ता करण्यापूर्वी थोडे कोमट पाणी प्या आणि काही वेळ व्यायाम करा. हे तुम्हाला फिट ठेवेल.
निरोगी शरीरासाठी, नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये किमान 5 तासांचे अंतर ठेवा. म्हणजे सकाळी 9 वाजता नाश्ता केला तर दुपारी 2 वाजता जेवण करता येईल.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ ही संध्याकाळी 6 ते 9 योग्य आहे.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या सुमारे 3 तास आधी केले पाहिजे. कारण रात्री अन्न पचायला जास्त वेळ लागतो.
तुम्हीही या वेळी जेवलात तर लठ्ठपणासह अनेक आजार टाळता येतील.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक