तुम्हाला दिवसाची सुरुवात चहाने करायची सवय असेल तर दुधाच्या चहाऐवजी लेमन टी फायदेशीर ठरेल.
नियमितपणे लिंबू चहा प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतील.
लिंबू चहामध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई, थायामिन, नियासिन असे अनेक पोषक घटक आढळतात
जे तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. लिंबू चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लिंबू चहा व्हिटॅमिन सी सारख्या अनेक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.
तुम्ही या चहाचे सेवन केल्यास संसर्गापासून दूर राहाल.
लिंबूमध्ये असलेले गुणधर्म तुमची चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
लिंबू चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात, जे तुम्हाला संसर्गापासून सुरक्षित ठेवतात.
त्यामुळे लिंबू चहा प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
हा चहा प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. नियमितपणे लिंबू चहा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं.
लिंबूपासून बनवलेला चहा प्यायल्याने तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवू शकता.