मेथीची भाजी खाताना नाक मुरडता?जाणून घ्या त्याचे फायदे

मेथीची भाजी चवीला थोडी कडू असल्याने अनेकजण ती खाताना नाक मुरडतात.

 परंतु भाजी चवीला कडवट असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

मेथीच्या भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांचा धोका कमी होतो.

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीच्या भाजीचे सेवन केल्यास केस काळे आणि चमकदार होतात.

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील मेथीची भाजी फायदेशीर ठरते.

मेथीच्या भाजीत अँटिऑक्सिडंट्स असतात.

या अँटिऑक्सिडंट्समुळे स्तनांच्या आणि आतड्यांच्या कर्करोगाला मेथी प्रतिबंध करते.

मेथीची पाने भिजवून त्याची पेस्ट बनवून त्वचेवर लावल्याने त्वचा स्वच्छ आणि मऊ दिसते.

मेथीच्या पानांची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास काळे डाग आणि आणि सूज कमी होते.