लसणासोबतच त्याची पानंही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

अँटिऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांसोबतच व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक लसणाच्या पानांमध्ये आढळतात.

ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. हे खाल्ल्याने तुम्ही सीजनल आजारांपासून सुरक्षित राहता.

लसणाच्या पानांचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुधारते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

लसणाच्या पानात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतं, जे हृदयासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

ही पानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रित ठेवतात.

वजन कमी करण्यातही लसणाची पानं खूप मदत करू शकतात.

त्यात कमी कॅलरीज आणि फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. ते खाल्ल्यानं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.

लसणाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि आवश्यक खनिजे आढळतात.

हे खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे गुडघेदुखी दूर होते.