गॅसच्या फ्लेमवर भाजलेली चपाती अशी ठरू शकते घातक..
प्रत्येक घरात रोजच्या जेवणात भाकरी, चपाती किंवा फुलक्याचा समावेश असतो.
शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती आरोग्यासाठी पोषक असते.
बऱ्याचदा तव्यावरून थेट गॅसच्या आचेवर चपात्या भाजल्या जातात.
मात्र, थेट गॅसवर चपाती भाजने आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
अभ्यासानुसार, वायू कार्बन मोनोऑक्साइड आणि वायू प्रदूषक सोडतो.
यामुळे श्वसनाचे आजार, हृदय समस्या, कर्करोग इत्यादींचा धोका वाढू शकतो.
निरोगी राहण्यासाठी चपाती कापडाने दाबून तव्यावरच भाजावी.
तव्यावरची उष्णता सर्वत्र एकसारखी राहते, त्यामुळे चपाती जळत नाही.