टाइप-1 आणि टाइप-2 डायबिटीज मधील फरक!
अनियमित आहार, बैठे काम, व्यायामाचा अभाव अशा गोष्टींमुळे मधुमेह होतो.
त्यामुळे गोड खाणाऱ्या लोकांनाच डायबिटीज किंवा मधुमेह होतो असे अजिबात नाही.
मधुमेहाचे दोन प्रकार असतात, याला टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेह म्हणतात.
वारंवार मूत्रविसर्जन, खूप तहान लागणे, वारंवार भूक लागणे, खूप थकणे, अस्पष्ट दृष्टी, जखम बरी न होणे मधुमेहाची लक्षणं आहेत.
टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये फरक जाणून घेऊया.
टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना खूप काळ लक्षणे दिसत नाहीत.
टाईप 2 मधुमेहामध्ये इन्सुलिन कमी बनते किंवा शरीर त्याबद्दल संवेदनशील नसते, म्हणून शरीरात इन्सुलिनसाठी औषध सोडले जाते.
टाइप 1 मधुमेहाची लक्षणे वेगाने विकसित होतात आणि काही आठवड्यांतच दिसतात.
टाइप 1 मधुमेहात शरीरात इन्सुलिन अजिबात तयार होत नाही. यामुळे रुग्णाला वेळोवेळी इंजेक्शन, पंपाद्वारे इन्सुलिन घ्यावे लागते.