चुकूनही खाऊ नका एक्स्पायर झालेली बिस्किटं, वाचा दुष्परिणाम  

बहुतेक लोकांना सकाळी सकाळी चहा बिस्किटे खाण्याची सवय असते. 

पण आपल्यापैकी फार कमी लोक पाकिटावर एक्स्पायरी डेट पाहून बिस्किटे खातात. 

बिस्किटावर एक्स्पायरी डेट लिहिली आहे की नाही हे अनेकांना माहीत नसते. 

एक्सपायरी डेट असलेली बिस्किटे बाजारात मिळतात आणि काही वेळा लोक चुकून ती खातात. 

कालबाह्य झालेली बिस्किटं खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

या प्रश्नाचे उत्तर बंगळुरू येथील अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डॉ. प्रियंका रोहतगी यांनी दिले आहे. 

जर कोणी चुकून कालबाह्य झालेली बिस्किटे खाल्ली तर त्यांच्या पोटात ई-कोलाय बॅक्टेरिया जाण्याचा धोका असतो.

त्याच्यासोबत काही प्राणघातक जीवाणूही पोटात जातात. 

एक्स्पायर झालेली बिस्किटं खाल्ल्याने किडनी आणि लिव्हर खराब होण्याचा धोका असतो. 

असे अन्न खाल्यास विषबाधा होते, ओटीपोटात दुखणे, जुलाब, उलट्या, मळमळ, गोळा येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. 

बिस्किटे खाल्ल्यानंतर ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा, अन्यथा आजार कायम राहिल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो.