मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेऊन पुन्हा वापरता? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच!

मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेऊन पुन्हा वापरता? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच!

बऱ्याचदा पीठ जास्त झाले म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा वापरले जाते.

मात्र अशाप्रकारे कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवणे खरंच सुरक्षित आहे का?

अनेक घरांमध्ये पीठ पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि नंतर वापरले जाते, जे धोकादायक ठरू शकते.

अनेक संशोधनांनी असे म्हटले आहे की, बहुतेक जीवाणू कमी तापमानात निर्माण होऊ शकतात.

पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

असे पीठ खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्यासोबतच अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते.

फ्रीजमध्ये कमी तापमानामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे फ्रीजमध्ये काहीही ठेवण्यापूर्वी ते आधी नीट स्वच्छ करा.

मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यास त्यात पाण्याचे प्रमाण कमी असावे आणि ते एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवावे.