मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा

मैद्याचा नाही तर भाकरीचा पिझ्झा

भारतीय पदार्थांसोबत अलिकडे पिझ्झा देखील अनेकांच्या आवडीचा पदार्थ झाला आहे. 

सध्या मुंबईमधील घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये भाकरी पिझ्झा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

भारतीय पद्धतीने तयार केलेल्या या पिझ्झाला विविध वयोगटाची मागणी आहे.

घाटकोपर पूर्व येथे खाऊ गल्लीमध्ये अल्पा कुबावत यांचा रामानंदी स्टॉल आहे. 

कोरोनामध्ये घरची परिस्थिती बिघडली होती आणि आर्थिक समस्या जाणवत होती. 

अशा वेळेसच घरात बाजरीच्या भाकरीवर, गव्हाच्या भाकरीवर पिझ्झा तयार केला. 

बाजारात मिळणारा पिझ्झा मैद्याचा असल्यामुळे तो शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतो. 

भाकरी पिझ्झा पौष्टिक असून त्यामुळे आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असं कुबावत सांगतात.