हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात 5 लक्षण

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर रुग्णाला काही संकेत देत असतं.

तेव्हा याकडे दुर्लक्ष करण तुमच्या जीवावर बेतू शकत.

छातीत दुखणे हे हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे.

तुमच्या हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्या असतील किंवा हार्ट अटॅक येणार असेल तर तुमच्या छातीत वेदना, घट्टपणा आणि दाब जाणवतो.

कधीकधी काही लोकांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी उलट्या, मळमळ, अपचन, छातीत जळजळ, पोटदुखी यासारख्या समस्या सुरू होतात.

जर तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

पुरुषांपेक्षा स्त्रियांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी उलट्या, मळमळ इत्यादी सर्व लक्षणे अधिक जाणवतात.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक वेळा शरीराच्या डाव्या बाजूला दुखणे सुरु होते. जे हळूहळू इतर अवयवांमध्ये पसरू लागते.

तुम्हाला छातीपासून हातापर्यंत वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा.

 जर तुम्हाला तुमच्या छातीच्या मध्यभागी वेदना किंवा दाब जाणवत असेल, जो तुमच्या घशात किंवा जबड्यापर्यंत पसरत असेल, तर ते हार्ट अटकचे लक्षण असू शकते.

जर तुम्हाला हिवाळ्यात जास्त घाम येत असेल, तोही कोणत्याही कारणाशिवाय, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

घाम येणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा जा.