सर्वात जास्त महागाई असलेले देश, या यादीत भारत कितव्या क्रमांकावर?
तुम्हाला माहितीय का की भारतच नाही तर इतर ही असे देश आहेत ज्यांना महागाईचा फटका बसला आहे.
जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी पाहिली तर सध्या भारतात ते कमी आहे.
दरम्यान, जगातील कोणत्या देशाला महागाईचा सर्वाधिक फटका बसला आहे ते जाणून घेऊया.
महागाई ही बाजाराची अशी स्थिती आहे जिथं वस्तू आणि सेवांच्या किंमती सतत वाढत असतात. अशा परिस्थितीत कमी वस्तू खरेदी करण्यासाठीही जास्त पैसे खर्च करावे लागते.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक यादी जारी केली आहे, ज्यामध्ये कोणत्या देशात सर्वाधिक महागाई आहे हे सांगण्यात आले आहे.
या यादीत अर्जेंटिना पहिल्या क्रमांकावर आहे. जिथे महागाई दर 272 टक्के आहे, म्हणजेच भारतापेक्षा 60 पट जास्त आहे.
याशिवाय, महागाईच्या बाबतीत टॉप 10 देशांबद्दल बोलायचं झालं तर अर्जेंटिना, सीरिया, तुर्की, लेबनॉन, व्हेनेझुएला, नायजेरिया, इजिप्त, पाकिस्तान, बांगलादेश आणि रशिया आहेत.
भारताबद्दल बोलायचे झाले तर अहवालानुसार, भारत महागाईच्या बाबतीत जगात 13 व्या स्थानावर आहे, जिथे महागाईचा दर 5.08 टक्के आहे.
आपण भारताच्या शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेशबद्दल बोललो तर ते या यादीतील टॉप-10 देशांमध्ये समाविष्ट आहेत.