ही 5 लक्षणं सांगतात, धमन्यांमध्ये साचलंय कोलेस्टेरॉल!

हेल्दी राहण्यासाठी आपलं हृदय निरोगी राहणं खूप आवश्यक आहे. 

हल्ली कमी वयातच लोकांना हृदयासंबंधित समस्या होऊ  लागल्या आहेत. 

हृदय विकाराचे मोठे कारण असते कोलेस्टेरॉल वाढणे. 

या 5 लक्षणांद्वारे तुम्ही ओळखू शकता तुमच्या धमन्यांमध्ये  साचलंय कोलेस्टेरॉल. 

डोळ्यांच्या आसपास पिवळे डाग दिसणे हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. 

कोलेस्टेरॉल वाढल्यावर आयरिसमध्ये व्हाईट रिंग्स दिसू शकतात. 

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास त्वचेवर पुरळ, रॅशेस दिसू शकतात. 

नखांमध्ये डार्क लाईन, नखांना तडे जाणं हे कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं. 

वयस्कर लोकांमध्ये टोटल कोलेस्टेरॉल 125 ते 200 च्या मध्ये असले पाहिजे.