दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी
6 घरगुती उपाय
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतात. काहीजण यादिवशी आपल्या मित्रमंडळींसोबत मद्यपेय पिण्यास आनंद मानतात.
परंतु दुसऱ्या दिवशी दारूचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
हॅंगओव्हर उतरवण्यासाठी संत्र्याचा रस घेऊ शकता. संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी असल्यामुळे उलटी, मळमळ यापासून आराम मिळतो.
हॅंगओव्हरपासून बचावासाठी तुम्ही मद्यपान करण्यापूर्वी काही वेळ आधी केळे देखील खाऊ शकता.
हॅंगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी हा लोकप्रिय उपाय आहे. एक कप कडक कॉफी प्यायल्याने हॅंगओव्हर निघून जाते.
एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या. यामुळे सुस्ती दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो.
दारूची नशा उतरवण्यासाठी आल्याचा चहा देखील पिऊ शकता. यामुळे डोकेदुखीवर देखील आराम मिळेल.
दह्यापासून बनलेली लस्सी हॅंगओव्हर उतरवण्यास मदत करते.
नारळाचे पाणी देखील हॅंगओव्हर उतरवण्यासाठी योग्य ठरू शकते.