दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी वापरा  5 उपाय

दात पिवळे पडले असतील तर कोणासमोर हसताना लाज वाटते.

खाताना अन्नाचे कण दातांमध्ये अडकतात आणि त्यावर प्लेक तयार होतो, हे दात पिवळे होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

तुळशीची पाने आणि संत्र्याची साल ही पिवळ्या दातांवर प्रभावी ठरू शकते.

तुळशीच्या 7 पानांची पेस्ट बनवा मग वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर बनवून दोन्ही गोष्टी एकत्र करा. 20 मिनिटे ही पेस्ट दातांवर लावून मग तोंड धुवा.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयोगी ठरू शकतो.

2 चमचे बेकिंग सोडा घेऊन त्याची पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट बनवा आणि 5 मिनिटे दातांना लावा आणि धुवून टाका.

लिंबू आणि मीठ देखील दातांना चमकवण्यासाठी प्रभावी ठरते.

1 चमचा मीठ घेऊन त्यात लिंबाचा रस वापरून मीठाची घट्ट पेस्ट बनवा आणि त्याने नियमित दात घासा.

कोळसा किंवा चारकोलने दात घासणे हा पांढऱ्या दातांसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय आहे.

कोळशाचे काही तुकडे कुस्करून पावडर करा. टूथब्रश पाण्याने ओला करा आणि त्यावर काही प्रमाणात कोळशाची पावडर टाकून घासा.

दोन चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर घेऊन ते 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळा. यापाण्याने गुळण्या करा.