अंगावर पित्त उठलंय?  5 घरगुती उपाय  ठरतील प्रभावी

शरीरावर पित्त उठण्यामागे विविध कारण असतात. तेव्हा त्यावर काही घरगुती उपाय परिणामकारक ठरू शकतात.

पुदिन्याच्या पानांचा रस अंगाला लावावा.

पाण्यात किंवा दुधात हळद मिसळून प्यावी.

पित्त उठल्यावर कोकम सरबत प्यायल्यास आराम मिळतो. तुम्ही कोकमाचा रस अंगाला देखील लावू शकता.

आलं आणि काळीमिरी देखील परिणामकारक ठरते.

आल्याच्या रसात मध किंवा तूप टाकून खाल्ल्याने पित्ताच्या त्रासापासून आराम मिळतो.

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

फळ, भाज्या, कोथिंबीर इत्यादींचा आहारात समावेश करावा.

पित्ताचा त्रास होत असेल तर आहारात तुळस, आवळा कोरफड इत्यादींचा समावेश करावा.