बिबट्याच्या शरीरावर काळे डाग कसे येतात? घ्या जाणून!

अनेक प्राण्यांच्या अंगावर विशिष्ट रंगाच्या खुणा असतात.

जसे झेब्रावर काळे-पांढरे पट्टे तर जिराफवर तपकिरी बिंदू.

याचप्रमाणे बिबट्याची ओळख त्यांच्या अंगावर असलेल्या काळ्या डागांनी होते.

बिबट्याच्या अंगावर हे काळे डाग कसे तयार होतात कधी विचार केलाय का? 

या प्रश्नाचं उत्तर, कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाच्या टीमनं शोधून काढलंय.

या शोधासाठी टीमनं अॅलन ट्युरिंगच्या दशकापूर्वीच्या सिद्धांताचा अवलंब केला.

या सिद्धांतामुळे समोर आलं की, दोन रासायनिक तंत्र एका पॅटर्नचा निर्माण करतात. 

यातील एक एजंड काळे डाग निर्माण करतो तर दुसरा पसरवण्याचं काम करतो.