नारळात पाणी येतं
कुठून
?
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
नारळात पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक इलेकट्रोलाईट्स असतात.
पण तुम्हाला माहितीये का की उंच झाडावर उगणाऱ्या नारळात पाणी नेमकं कुठून येत?
नारळात आढळणारे पाणी हे झाडाच्या मुळांमधून निघणाऱ्या कॅपिलॅरीस मधून उंच झाडावर आलेल्या नारळपर्यंत पोहोचते.
मुळांमधून शोषले गेलेले पाणी हे नारळासहित संपूर्ण झाडापर्यंत पोहोचते.
नारळात असलेल्या पाण्याला झाडाचं इंडोस्पर्म असे म्हणतात.
जेव्हा नारळ जुना होतो तेव्हा त्यातील पाणी सुकू लागते.
नारळ पिकू लागल्यावर त्यातील इंडोस्पर्मचा काही भाग कठीण बनतो त्याला आपण मलाई असे म्हणतो.
सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. न्यूज १८ मराठी याची पुष्टी करत नाही