अनेक असं होतं की कुठल्याही परिक्षेपूर्वीच पेपर लीक होतो. मात्र हा पेपर नेमका कसा लीक होतो? 

एवढी सेफ्टी असूनही हा पेपर कसा फुटतो? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

कोणत्याही विषयाचा पेपर तयार करण्यासाठी त्या विषयाचे तज्ज्ञ आणि जाणकार मंडळी असतात. 

तज्ज्ञ, जाणकार मंडळी काही प्रश्नांची यादी करतात आणि परिक्षा विकास समिती त्याची तपासणी करते.

पेपर सेट झाल्यावर त्याची तपासणी करुन अंतिम पेपर सेट केले जातात. 

या दरम्यान कोणी प्रश्न काढू शकतात किंवा आणखी अॅड करु शकतात. यावेळी पेपर लीक होऊ शकतात.

ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पेपरची सर्व माहिती आणि सुरक्षिततेसाठी NTA जबाबदार आहे. 

कारण या परीक्षा ऑनलाइन सर्व्हरद्वारे घेतल्या जातात. NTA ही एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे.

ऑफलाइन पद्धतीचे पेपर परीक्षेपूर्वी वेगवेगळ्या केंद्रांच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले असतात. सेफ्टीसाठी नेहमीच सुरक्षा रक्षक असतो.

परीक्षेपूर्वी, परीक्षा अधिकारी सुरक्षा अधिकाऱ्यांसह सेफ्टी रूम उघडतात. पेपरचे वितरण करतात.