सीलिंग फॅन किती उंचावर बसवावा?

अनेकांची तक्रार असते की सीलिंग फॅन लावून देखील त्याचा वारा नीट येत नाही.

खरं तर वारं नीट येण्यासाठी तुमच्या खोलीचा आकार, पंख्याचा आकार, त्याच्या मोटरची क्षमता या गोष्टी त्याचं वारं नीट येण्यासाठी महत्त्वाच्या आहेतच.

परंतु चांगला वारा येण्यासाठी पंखा किती उंचावर आहे हेही महत्त्वाचं असतं.

सीलिंग फॅन खोलीतील फरशीपासून किती उंच असावा हे अनेकांना माहिती नसतं.

अमेरिकन लायटिंग सोसायटीच्या मते चांगलं वारं हवं असेल तर पंखा फरशीपासून आठ ते नऊ फूट उंचीवर असण्याची गरज आहे.

पंख 8 ते 9 फूट उंचीवर असलेल्या पंख्याला हात किंवा डोकं लागायची शक्यता नसते. त्यामुळे तो सुरक्षित असतो आणि त्याचं वारंही खोलीच्या सगळ्या भागांमध्ये छान पोहोचतं.

पंखा छतापासून साधारण आठ इंच खाली असावा. छतापासून अगदी जवळ असलेल्या पंख्यातून गरम वारं येतं.

पंख्याच्या पात्यांच्या साधारण सहा इंचांपर्यंतच्या कक्षेत कुठलीही वस्तू येणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा