'या' किड्यांपासून बनतात लिपस्टिक्सच्या शेड्स

लिपस्टिक्समध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात. लोक आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला सुट होईल अशा रंगाचा शेड निवडतात.

पण तुम्हाला माहितीय का की हा शेड कशापासून तयार होतो?

Peta च्या वेबसाईटनुसार लिपस्टिकचे रंग हे कॅकटसच्या झाडावर मिळणाऱ्या एका प्रकारच्या किड्यापासून बनवले जाते.

या किड्यांपासून लाल किंवा अन्य रंगाचे शेड्स बनवले जातात. याचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर एका युजरने शेअर केला.

कारमाइन असं बोलल्या जाणाऱ्या या पदार्थापासून लाल, पर्पल, गुलाबी सोबतच इतर रंग देखील बनवले जातात.  ते लिपस्टिकमध्ये टाकले जाते.

ओठांची लिपस्टिकच नाही तर आयशॅडो आणि ब्लशमधील शेडसाठी देखील या किड्यांचा वापर केला जातो.

यापासून वाचण्यासाठी लिपस्टिकवर 'Carmine' किंवा 'cochineal extract' असं लिहिलेलं नसावं.

तसेच तुम्ही अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी विगन कॉस्मॅटिक्स देखील विकत घेऊ शकता.