प्लॅटफॉर्म तिकीट किती वेळापर्यंत वापरु शकतो?
तुम्हीही रेल्वेनं अनेकदा प्रवास करत असाल मात्र तुम्हाला माहितीय का स्टेशनवर काढलेलं प्लॅटफॉर्म तिकीटाचाही कालावधी असतो.
जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबल्यास त्याचा दंड भरावा लागू शकतो.
मित्रांना, नातेवाईकांना सोडवण्यासाठी अनेक लोक रेल्वे स्टेशनवर येत असतात. अशा वेळी त्यांना प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागतं.
प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर लोक बराच वेळ स्टेशनवर थांबतात. मात्र यासाठी नियम असून प्लॅटफॉर्म तिकीटाचाही वेळ असतो.
10 रुपयांना प्लॅटफॉर्म तिकीट मिळतं. काही वेळा यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
तुम्ही तिकीट घेऊन त्यापेक्षा जास्त वेळ थांबल्यावर तुम्हाला दंड भरावा लागतो.
प्लॅटफॉर्म तिकीट हे 2 तासांसाठी व्हॅलिड असतं.
तुम्ही या वेळेपेक्षा जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबलात तर तुम्हाला यासाठी 250 रुपये दंड भरावा लागू शकतो.
जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबव्यावर तुम्हाला दंडासोबत जवळच्या रेल्वे स्टेशनचंही भाडं आकारलं जातं.