विदर्भातील फेमस मटका रोटी, सोपी रेसिपी

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. राज्यातील प्रत्येक भागातील प्रत्येक पदार्थ हा तितकाच चवीने खाल्ला जातो.

त्यातल्या त्यात विदर्भातील खाद्य संस्कृती तर भन्नाटच! पोळी बनवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास पद्धत वापरली जाते.

त्यात पोळीमध्ये विदर्भातील मांडे अर्थात मटका रोटी खूप प्रसिद्ध आहे.

या लांब पोळीमुळे जगभरात नागपूरची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. मांडे नेमके कसे बनवतात पाहुयात

गहू बारीक दळून 20 मिनिटे भिजत घालावा लागतो. मोठ्या परातीत पिठात पाणी टाकत पीठ भिजवलं जात आणि वारंवार पटकलं जातं.

त्यात चिक्की येईपर्यंत पटकलं जातं. नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करुन अलगद माठावर टाकला जातो.

पूर्णपणे शिजल्यानंतर, रोटी काळजीपूर्वक मटक्यावरून उतरवल्या जातात.

केळीच्या पानात मोमोज कधी खाल्लेत का?