वयानुसार लोकांच्या झोपेचे तास बदलत राहतात. कोणत्या वयोगटातील लोकांना किती तासांची झोप आवश्यक आहे याविषयी जाणून घेऊया.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि नैराश्य असे आजार होऊ शकतात.
दररोज 7-8 तास झोप घेणे सर्व लोकांसाठी पुरेशी आहे, परंतु तसं नाही. प्रत्येकाच्या वयानुसार झोपेचे तास वेगवेगळे असतात.
CDC नुसार, 0 ते 3 महिने वयाच्या नवजात बालकांना 14 ते 17 तासांची झोप लागते.
4 ते 12 महिने वयोगटातील मुलांना 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते.
1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तासांची झोप आवश्यक असते.
3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी, दररोज 10 ते 13 तासांची झोप पुरेशी मानली जाते. तर 9 ते 12 वर्षांच्या मुलांनी दररोज 9 ते 12 तास झोपले पाहिजे.
13 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुणांनी 24 तासांत 8 ते 10 तास चांगली झोप घेतली पाहिजे.
18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी, दररोज 7 तासांची चांगली झोप पुरेशी आहे.
61 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांसाठी दररोज 7 ते 9 तास झोपणे आवश्यक आहे. 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांनी किमान 7 ते 8 तास झोपावे.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
भारतातील पहिला मोबाईल फोन कोणत्या कंपनीचा होता माहितीय का?
जिवंत माशासोबत मॉडेलचा रॅम्प वॉक
चालत्या ट्रकमध्ये झोका खेळतेय व्यक्ती