पण तुम्हाला माहिती आहे का? दारू पिण्याची लिमिट वयावरही अवलंबून आहे.
पहिल्यांदाच भौगोलिक प्रदेश, वय आणि लिंगानुसार अल्कोहोलच्या धोक्याचं विश्लेषण करणारा ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचा रिपोर्ट लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
संशोधनात कोणत्या वयात किती प्रमाणात अल्कोहोल घेणं योग्य आहे आणि किती प्रमाणात दारू घातक ठरू शकते, याचं विश्लेषण करण्यात आलं आहे.
वृद्धांपेक्षा तरुणांसाठी दारू जास्त धोकादायक आहे, असं या संशोधनात म्हटलं आहे.
15 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये अल्कोहोलचे सेवन सर्वात धोकादायक आहे.
कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती दारू योग्य असेल याचा अंदाजही संशोधनाने लावला आहे.
त्यानुसार 15 ते 39 वयोगटासाठी दररोज 0.136 स्टँडर्ड ड्रिंक आहे. महिलांसाठी ते 0.273 आहे.
40 ते 64 वयोगटातील निरोगी लोकांसाठी सुरक्षित अल्कोहोलचं प्रमाण दररोज हाफ स्टँडर्ड ड्रिंक (पुरुषांसाठी 0.527 आणि महिलांसाठी 0.562) ते दोन स्टँडर्ड ड्रिंक्स (पुरुषांसाठी 1.69 आणि महिलांसाठी 1.82 पर्यंत) शिफारस केली आहे.
धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे गंभीर जीवघेणे आजर उद्भवू शकतात. तेव्हा न्यूज १८ मराठी धुम्रपानाचं समर्थन करीत नाही.