दररोज किती लसूण खाणं योग्य?

प्रत्येक स्वयंपाक घरात लसूण हमखास सापडेल.

मात्र जास्त लसूण खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. 

आयुर्वेदानुसार लसणाचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. 

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे तोटेही आहेत.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार , लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यानं रक्त पातळ होण्याची समस्या होऊ शकते. 

लसूण रोज खाणं किती फायदेशीर आहे आणि जास्त खाण्याचे तोटे काय आहेत यावर लक्ष द्यायला हवं. 

लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या रोज खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

 त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही उद्भवू शकते.