मासिक पाळी दरम्यान अनेक महिला या सॅनिटरी पॅड वापरतात.
मात्र काही महिला पाळीच्या दिवसांमध्ये हा सॅनिटरी पॅड तासंतास बदलत नाहीत.
पण जर घाण पॅड तुम्ही खूप काळ बदलला नाही तर यामुळे त्यातील किटाणू हे शरीरात प्रवेश करू शकतात.
त्यामुळे वेळोवेळी पॅड बदलत राहणं गरजेचं आहे.
पिरियड दरम्यान सॅनिटरी पॅड वापरला की तो जवळपास ३ ते ४ तासांनी बदलायला हवा.
जर ब्लड फ्लो जास्त असेल तर याहून लवकर तुम्ही पॅड बदलायला हवा.
वापरलेला सॅनिटरी पॅड जर तुम्ही जास्त काळ बदलला नाही तर यातून दुर्गंधी येऊ लागते.
तसेच सॅनिटरी पॅडमुळे इंफेक्शन होण्याचा सुद्धा धोका असतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)