कापलेलं सफरचंद काळ पडू नये म्हणून काय कराल?
सफरचंद कापल्यावर जर ते लगेच खाल्ले नाही तर काळे पडू लागते.
सफरचंद कापल्यावर त्याचा संपर्क ऑक्सिजनसोबत येतो आणि त्यातून एन्जाइम रिलीज होतात. ज्यामुळे सफरचंद ऑक्सिफाइड होऊ लागतात आणि काळे पडतात.
तेव्हा काही टिप्स लक्षात घ्या ज्यामुळे सफरचंद काळे होणार नाही.
कापलेल्या सफरचंदवर लिंबाचा रस किंवा
संत्र्याचा
रस टाकू शकता. याने फळ काळं पडणार नाही.
सफरचंद आबंट फळांच्या रसात बुडवून ठेवू शकता. ज्याने ते काळे पडत नाहीत. पण यामुळे टेस्टमध्ये थोडा फरक पडेल.
सोडियम क्लोराईड एक केमिकल आहे जे ऑक्सिडेशनची प्रक्रिया रोखत.
सफरचंदच्या फोडी करून त्यावर चारही बाजूंनी टाईट रबर बॅंड बांधा जेणेकरुन कापलेल्या फोडींना हवा लागणार नाही. असे केल्याने फळ काळं पडणार नाही.
कापलेला सफरचंदला मिठाच्या पाण्यात काही वेळासाठी टाकून ठेवा.
या पाण्यात सफरचंद चांगल्याप्रकारे भिजल्यावर त्याला काढून साध्या पाण्याने धुवून घ्या. यामुळे सफरचंद काळे पडणार नाही.