फोनवर वारंवार जाहिराती येतात? करा ही सेटिंग  

फोनवर येत असणाऱ्या जाहिरातींमुळे आपण त्रस्त होतो.

यूट्यूब, फेसबुकवरील जाहिराती स्किप करता येतात. पण मोबाईलवरी जाहिराती स्किपही करता येत नाही.

अशा वेळी त्या येऊच नयेत म्हणून काय करावं हे आपण जाणून घेऊया.

फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन गूगलवर टॅप करा. नंतर  Manage your google accoun वर क्लिक करा.

या ऑप्शनवर टॅप केल्यास Data & Privacy चा ऑप्शन मिळेल.

यानंतर तुम्ही येथे थोडं खाली स्क्रोल केलं तर ‘Personalized Ads’ मिळेल.

आता तुम्हाला दिसेल की, तुमची कोणकोणती अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक होतेय. ज्यामुळे तुम्हाला जाहिराती दिसत आहेत.

Personalized Ads च्या खाली तुम्हाला ‘My Ad Center’ चा ऑप्शनही दिसेल.

यावर तुम्ही टॅप केल्यास,  Personalized Ads चा टॉगल ओपन होईल. जो तुम्हाला OFF करावा लागेल.

आता Settings मध्ये जाऊन गूगलवर टॅप करावं लागेल. नंतर Delete Advertising ID वर टॅप करुन ते डिलीट करायचं आहे.

यानंतर तुम्हाला फोनवर कोणत्याही प्रकारची कोणतीच जाहिरात दिसणार नाही.